राज्याचे नव्या औद्योगिक धोरण म्हणजे ‘हाऊसिंग पॉलिसी’ असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावली. अशा पद्धतीने राष्ट्रवादीने केलेली टीका चुकीची असून उद्भवलेले गैरसमज दूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंतची धोरणे राबवूनही औद्योगिक क्षेत्रांच्या जागांवर अतिक्रमित झोपडपट्टय़ाची बजबजपुरी माजल्याचे चित्र दिसले आहे. त्यामुळे ४० टक्के जागा हाऊसिंगसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून होणारी टीका अनाठायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक धोरणाचे जोरदार समर्थन केले.
आंध्र, पंजाब सरकारांनी गुंतवणूकदारांना मोफत भूखंडाचे धोरण राबविलेले आहे, याचे उदाहरण देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सरकारांनी अटी-शर्ती निर्देशित करण्याचे जुने दिवस सरलेले आहेत. गुंतवणूकदारांना संधी/सवलती दिली जात असताना उद्योग वेळेत उभारणे, उत्पादन सुरू करणे या गोष्टीसुद्धा औद्योगिक जगताकडून अपेक्षित आहेत. एकखिडकी योजनेतून उद्योगांना सर्व क्लिअरन्स मिळेल, यावर सरकारही भर देत आहे. यातून फायदा हा स्वतंत्र विषय असू शकेल, परंतु, नव्या धोरणावर होणारी टीका एकतर्फी आहे, असे मला वाटते.
उदारतेचे असून उद्योग क्षेत्रात नवे बदल घडवून आणणारे निश्चित ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. गुंतवणूकदारांना फक्त गुंतवणुकीचे आकर्षण दाखविणारे पारंपरिक औद्योगिक धोरण बदलून उद्योगाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करणे, मोठय़ा शहरांवरील वाढता दबाव कमी करणे, नियोजनबद्ध उद्योग निर्मिती, रोजगार संधींची उपलब्धता आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांचे जीवनमान उंचावणे या उद्दिष्टांसह तयार झालेले धोरण बरेच बदल घडवून आणेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
औद्योगिक धोरणावरील टीका अनाठायी -मुख्यमंत्री
राज्याचे नव्या औद्योगिक धोरण म्हणजे ‘हाऊसिंग पॉलिसी’ असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना फेटाळून लावली. अशा पद्धतीने राष्ट्रवादीने केलेली टीका चुकीची असून उद्भवलेले गैरसमज दूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-01-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Critics on industrial policy is not good chief minister