रस्त्यांची चाळण
* खड्डय़ांतून मार्ग काढण्यात प्रशासनास अपयश
* कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा
ठाण्यात पुढील तीन वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, अशा मोठय़ा घोषणा करत महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील रस्त्यांना डांबराचा मुलामा देण्यासाठी सुमारे २३० कोटी रुपयांचा खर्च करणारा ठाणे महापालिकेचा अभियंता विभाग आणि तेथील सत्ताधारी पक्षाचे नेते शहरातील प्रमुख नाक्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या टिकेचे धनी ठरले आहेत. ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा, कोपरी, पाचपाखाडी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर अशा सर्वच परिसरांतील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून २३० कोटींचे रस्ते गेले तरी कुठे, असा सवाल आता ठाणेकर विचारू लागले आहेत. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांना पुढे करून इतके दिवस ठाण्याचा ‘मेकओवर’ करण्याची भाषा करणारे अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकारी या खड्डय़ांविषयी मूग गिळून बसले असून सर्वपक्षीय नगरसेवकांनीही मौन धारण केल्याचे चित्र दिसू लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा