दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच शिवबाचा जन्म झाला होता. आदिलशाहीला हादरा देत छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. आज शिवराज्यही नाही आणि रामराज्यही नाही. जिजाऊ आणि शिवबाचे स्वराज्य पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी संस्कारांची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील चैताली खटी यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने शहादा तालुका कृषी बाजार समितीच्या आवारात ‘मी जिजाऊ बोलतेय हा संगीतप्रधान एकपात्री प्रयोग चैताली खटी यांनी सादर केला. या प्रसंगी समितीचे प्रमुख डी. एच. पाटील, नगराध्यक्ष करुणा पाटील, समितीचे सभापती सुनील पाटील, प्रा. डॉ. जी. एस. पाटील, अ‍ॅड. बी. बी. पाटील, हैदरभाई नुराणी आदी उपस्थित होते. खटी यांनी प्रारंभी शिवकालीन कवी भूषण यांच्या खंड काव्यातील गीत गात राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन केले. त्यांनी कणखर आवाजात पोवाडाही सादर केला. या कार्यक्रमात गर्भसंस्काराचे महत्व विषद करून वर्तमान परिस्थितीवर त्यांनी प्रभावी भाष्य केले. जसा विचार मनात येतो तशी कृती घडत असते.
पुन्हा शिवाजी घडवायचा असेल तर संस्कार आणि नीतीमूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. सध्या आपण सण, उत्सव, परंपरांचे अर्थच बदलून टाकले आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात आहे. यासाठी प्रत्येकाने संकल्प सोडायला हवा, असे नमूद करीत त्यांनी आपल्या नाटय़प्रयोगातून जिजाऊंचे प्रभावी संस्कार तसेच शिवकालीन परिस्थिती श्रोत्यांसमोर मांडली. प्रास्तविक डी. एच. पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा