चोरीच्या गुन्हय़ात आरोपीकडून खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उदगीर येथील मुजीब सय्यद शिकूर यास चोरीच्या गुन्हय़ात अटक  न करण्यासाठी पोलीस नाईक महेश तांबारे याने ९ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपतच्या पोलिसांनी सापळा रचल्यानंतर तांबारे याने लाच घेतली नाही. पंचांसमक्ष लाच मागताच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. विभागाचे पोलीस अधीक्षक एस. डी. बाविस्कर, उपाधीक्षक अंकुशकर आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader