महापालिकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपातील गुन्हय़ात अटक करण्यात आलेला माजी नगरसेवक विनोद रूपसिंग कदम याला न्यायालयाने आज, गुरुवारी दि. ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
गेल्या आठ महिन्यांपासून विनोद कदम फरार होता. त्याला काल रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली व नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हवाली केले. अरणगाव येथील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा १९ एप्रिलला दाखल केला होता. परंतु तो तेव्हापासून फरारच होता. कदमची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याच्याकडून कागदपत्रे व पैसे हस्तगत करायचे आहेत, त्यासाठी पोलीस कोठडी मिळण्याची मागणी तपासी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी केली. कदम याच्या वतीने वकील महेश तवले व वकील संजय दुशिंग यांनी काम पाहिले.
माजी नगरसेवक कदम याला कोठडी
महापालिकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपातील गुन्हय़ात अटक करण्यात आलेला माजी नगरसेवक विनोद रूपसिंग कदम याला न्यायालयाने आज, गुरुवारी दि. ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
First published on: 06-12-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Custody to ex councilors kadam