मतदान ओळखपत्रात फेरफार करून बनावटगिरी करणाऱ्या पार्वती शंकर आडम या महिलेस पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोमवारी न्यायालयाने दिला. या महिलेकडून बोगस मतदान ओळखपत्राचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पार्वती आडम ही या रॅकेटमधील एजंट असून तिच्याकडून ५०हून अधिक बनावट ओळखपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.    
ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्रामध्ये फेरफार करणारी टोळी कार्यरत आहे. त्यासाठी एका कार्डकरिता ३०० रुपये घेतले जातात.आडमसारख्या एजंटना सूत्रधाराकडून १०० रुपये कमिशन दिले जाते. मूळ कार्डामध्ये वयाच्या ठिकाणी त्यांचे लॅमिनेशन काढून फेरबदल केला जात होता आणि ते पुन्हा लॅमिनेट करून लोकांना पोहोचविले जात होते. या प्रकारे आजरा, चंदगड, गडहिंग्लज भागात आडमने अनेकांना बनावट पद्धतीने वय वाढवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा