चित्रपट क्षेत्रातील डबिंग (संवाद ध्वनिमुद्रण) या तंत्रज्ञानाची कार्यशाळा नगरमध्ये २२ एप्रिल ते १ मे दरम्यान होत आहे. नगरमध्ये प्रथमच अशा स्वरूपाची कार्यशाळा होणार आहे.
निषाद क्रिएशन अँड इव्हेन्टस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील ए. के. स्टुडिओ यांनी त्यांना सहकार्य केले आहे. या क्षेत्रातील तज्ञ केदार आठवले या कार्यशाळेत चित्रपट, जाहिरातपट, व्यंगचित्रपट तसेच विविध भाषांमधील चित्रपट यासाठीचे डबिंग, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे डबिंग याची सविस्तर माहिती देणार आहेत.
न्यू आर्टस महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन विभागाच्या साहाय्याने आयोजित कार्यशाळेत एका तुकडीत १२ विद्यार्थ्यांचा समावेश व २ तासांचा वर्ग अशी रचना आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी मानसी भणगे (९९२२४१९३०६) व प्रसाद भणगे
( ९२२५३१६६१५) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा