राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एका दिवसाच्या अंतराने िपपरी-चिंचवड शहरात येत असून, ‘साहेबां’ चा कार्यक्रम ठरला असताना त्याआधी ‘दादां’ चा कार्यक्रम घेण्याची तत्परता दाखवण्यात आली.
अजित पवार शुक्रवारी दिवसभर शहरात आहेत. तर, शरद पवार रविवारी चिंचवडला येत आहेत. अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे. दुपारी दोनपासून िपपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ अजितदादांच्या हस्ते होणार आहे. साडेचार वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. सायंकाळी चिंचवडचा पैलवान विजय गावडे याने ‘भारत केसरी’ ही मानाची स्पर्धाजिंकल्याबद्दल त्याचा अजितदादांच्या हस्ते चापेकर चौकात जाहीर सत्कार होणार आहे. रविवारी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शरद पवार सहभागी होणार आहेत. यावेळी ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांचा सत्कारही  होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संभाजी म्हसे आदी उपस्थित राहणार आहेत.     

Story img Loader