कचरा डेपोवर १५० ते १६० टन कचरा जमा होत असल्याच्या नोंदी आहेत. हे खरे असेल तर शहर अजूनही अस्वच्छ कसे? असा सवाल आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला.
ऐन दिवाळीत शहराचा कचरा गोळा केल्या जाणाऱ्या डेपोला आमदार देशमुख यांनी भेट दिली व तेथील समस्या जाणून घेतल्या. कचऱ्याची विल्हेवाट व कचरा डंपिंग पाहणीही त्यांनी केली. कर्मचाऱ्यांकडील रोजच्या कचऱ्याच्या नोंदी त्यांनी पाहिल्या. रोज १५० ते १६० टन कचरा जमा होत असल्याच्या नोंदी होत्या. कचऱ्यामध्ये मुरूम, दगड आदींचा समावेश आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने नगरसेवकच वजनदार कचरा स्वीकारावा, असे लेखी पत्र पाठवत असतात असे सांगून काही नगरसेवकांची पत्रेही संबंधित कर्मचाऱ्यांनी आमदार देशमुखांना दाखवली. हा प्रकार अतिशय गंभीर असून प्रशासनाने स्वच्छतेबाबत अतिशय दक्ष राहण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले.