समर्थ विचारांचा माणूस घडविणे, हे दासनवमी उत्सवाचे ब्रीद ठेवून मागील ७५ वर्षांपासून विविधांगी कार्यक्रमाने तो साजरा करण्याची भंडारेकर महिलांची साधना केवळ कौतुकास्पद नाही तर, अभिमानास्पदही आहे. दिवं. माई बुचे यांनी लावलेल्या दासनवमी उत्सवाचा आज वटवृक्ष झाला आहे.
नऊ दिवसात भजन आणि दासबोध वाचनाची जबाबदारी विविध ठिकाणच्या भजन मंडळींनी घेतली. समर्थ रामदासाचे जीवन आणि चरित्र केन्द्रस्थानी ठेवून समर्थाच्या कार्याचा आणि उपदेशाचा तौलनिक अभ्यास होईल, असे विषय नऊ दिवसांच्या कार्यक्रमात घेतले जातात व तसेच यावर्षीही घेतले गेले.
संत वाड्.मयाचे गाढे अभ्यासक प्रा. सुमन्त देशपांडे यांनी संत नामदेव या विषयावर नामदेवांना वारकरी संप्रदायाची पताका सर्वदूर नेणारे व कीर्तन परंपरेचे आद्य उद्गाते ठरवत, समर्थ रामदासांच्या संघटना बांधणी व व्यवहारज्ञान कौशल्याचा परामर्श घेतला. साधनाताई पुरोहितांनी समर्थ रामदासांच्या ‘कल्याण करी रामराया’ या प्रार्थनेवर अतिशय रोचक प्रवचन केले. प्रा. रंजित पैठणकर समर्थ रामदास स्वामी व स्वामी विवेकानंद या राष्ट्रसंतांवर बोलले. दोघांनीही राष्ट्रनिर्मितीकरिता केलेल्या संघटनात्मक कार्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.संतवाणीवर आधारित भक्तीगीतांच्या कार्यक्रमाने ‘आजि सोनियाचा दिनू’ चा प्रत्यय श्रोत्यांना आणून दिला. विविध गीतांचे अंतरंग एकवटून आरती देशपांडे यांनी केलेले संचालन लक्षणीय ठरले. कीर्तनकला आधुनिक काळातही श्रोत्यांना किती लळा लावू शकते, याचा प्रत्यय परभणी येथील ॠतुजा जोशी यांचे समर्थ चरित्रावरील कीर्तन आणि औरंगाबादचे मनोहर बाळकृ ष्ण दीक्षित यांचे समर्थांचे ब्रह्मभोजन या विषयांवरील कीर्तनाचा आस्वाद घेतांना आला.
डॉ अस्मिता नानोटी आणि चमूने भजनरूपात भारूडे सादर केली आणि श्रोत्यांना संत एकनाथांच्या काळात फिरवून आणले. शिवकाळातील आनंदवनभुवनाचा प्रत्यकारी आनंद अरुणा खटी यांच्या गोपालकाल्याच्या कीर्तनाने द्विगुणित केला. विशेष म्हणजे, दासबोधाच्या चष्म्यातून आधुनिक काळाकडे बघतांना श्रोत्यांना समर्थ रामदासांचे द्रष्टेपण पदोपदी जाणवले. दासनवमीचा हा नऊ दिवसांचा कार्यक्रम शेकडो पुरुष व महिला भाविकांच्या खामतलाव परिसरातील श्री बहिरंगेष्टद्धr(२२४)वर व गणपती मंदिरातील भरगच्च उपस्थितीने कार्यकर्त्यांना यशाची पावती देऊन गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा