शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बुधवारी राष्ट्रीय पातळीवरील उच्च साखर उतारा गटातील ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील व मुख्य शेती अधिकारी एम. आर. कोरिया, स्वीय सहायक अशोक शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी अध्यक्ष जयंतीभाई पटेल, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. यापूर्वी दत्त कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.

Story img Loader