घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मनस्ताप करून घेत मातेने आपल्या दोन्ही मुलांना विषारी औषध पाजले व नंतर स्वत:देखील विषारी औषध घेतले. यात एका चिमुरडी मुलीचा अंत झाला. मातेसह दुसऱ्या मुलावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथे ही घटना घडली.
सोनी शिवानंद रुगी (वय ४) असे मातेने दिलेल्या विषामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई परवीन (वय ३५) व भाऊ सागर (वय २) यांना वाचविण्याचे प्रयत्न शासकीय रुग्णालयात सुरू आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात हजरत ख्वाजा सैफुल मुल्क दर्गाहमुळे प्रसिध्द असलेल्या हैद्रा येथे शिवानंद ईरण्णा रुगी याने आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यास पत्नीपासून दोन मुले झाली. परंतु घरगुती कारणावरून झालेल्या वादामुळे पत्नी परवीन हिने स्वत:च्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत:ही विषप्राशन केले. या घटनेचा तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस करीत आहेत.

Story img Loader