शनि चौक, स्वामी विवेकानंद चौकाच्या १०० मीटर परिसरात फिरत आहात का? मग चोर असाल तर गुपचूप पुढे निघा! साधी सर्वसामान्य व्यक्ती असाल तर चुकूनही वेडेवाकडे हावभाव किंवा चित्रविचित्र वर्तन, तशी सवय असली तरीही करू नका! कारण, कारण तुमच्यावर कॅमेऱ्याची नजर आहे. या चौकाच्या चारही रस्त्यांवरच्या १०० मीटर परिसराचे चित्रीकरण होणार आहे. दिवसाचे २४ तास व तेही रोजच्या रोज!
सीसीटीव्ही कॅमे-याच्या विश्वात गेल्या अनेक वर्षांच्या सेवेतून विश्वास निर्माण करणारे व्यावसायिक मंदार मुळे यांनी सामाजिक भान ठेवून आपल्या व्यवसायाच्या विक्री दालनाच्या उद्घाटनानिमित्त शनि चौकात स्वखर्चाने ही व्यवस्था केली आहे. ३६० अंशात सतत फिरणारे २ कॅमेरे त्यांनी बसवले असून पुढे रस्त्यावर साधे ४ कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्यातील चित्रीकरण मुळे यांच्या कार्यालयात दिसेल. काहीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आढळली तर ती थांबवता येईल किंवा दुर्दैवाने घडून गेली असेल तर त्याला जबाबदार कोण हे चित्रीकरणावरून समजून येईल. शहरातील अशा प्रकारची ही पहिलीच व्यवस्था आहे.
फक्त सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीतर दरवाजावर बसवता येणारे कॅमेरे, विद्युत कुलूप, व्हिडिओ फोन, विविध प्रकारचे सेन्सर असे सुमारे २५ ते ३० अत्याधुनिक प्रकार मुळे यांनी आपल्या स्वामी विवेकानंद चौकातील आपल्या विक्री दालनात ठेवले आहेत. शनिवारी (दि.२५) सायंकाळी ६ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या विक्री दालनाचे उद्घाटन होत आहे. त्याचवेळी या सर्व आधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

Story img Loader