डेकॅथलॉन किप्स्टा चषक अंतर क्लब फुटबॉल स्पर्धा
पेनल्टी शूट आऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात डीसीसी क्लबने बिटको फुटबॉल संघावर ४-१ अशी मात करून येथे आयोजित डेकॅथलॉन किप्स्टा चषक अंतर क्लब फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
क्रीडा साहित्य बनविणाऱ्या डेकॅथलॉन या कंपनीतर्फे आणि फुटबॉल स्कुल ऑफ इंडिया यांच्या वतीने येथील क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. अंतिम सामन्यात पूर्वार्धात बिटको क्लब १-० आघाडीवर होता. परंतु उत्तरार्धात डीसीसी क्लबने बरोबरी साधली. सामन्याची वेळ संपल्याने शेवटी पेनल्टी शुटचा आधार घ्यावा लागला.
१६ संघांनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन कुणाल धनवंत, कुमाल कानडे, फुटबॉल स्कुल ऑफ इंडियाचे निरज नेर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रा. थोरात यांनी किक मारून स्पर्धेला सुरूवात केली. पहिल्या दिवशी क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गांधीनगर फुटबॉल क्लब यांनी आपआपले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यांमदून डीसीसी क्लब आणि बिटको फुटबॉल क्लब यांनी उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या दिवशी पहिल्या उपांत्य सामन्यात डीसीसी क्लबने क. का. वाघ महाविद्यालयावर १-० अशी मता केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बिटको फुटबॉल क्लबने गांधीनगर फुटबॉल क्लबचा पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा पराभव केला.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स क्लबकडून खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू रौफ खान तसेच क. का. वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, फुटबॉल स्कुल ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अलोक शर्मा, डेकॅथलॉनचे कुणाल धनवंत, पंच शेखर चौधरी आदींच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेतील उत्कृष्ठ गोलरक्षक म्हणून अभिजीत पाटील, सर्वाधिक गोलबद्दल भूषण खांदवे आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून राजेंद्र बहादूर यांना गौरविण्यात आले.

Story img Loader