पंढरपूर तालुक्यातील खर्डी, बोहाळी, उंबरगाव रेल्वे क्रासिंगवर विनागेट जवळ इंडिया कार (एम.एच. ४५ एम. २७७७) रेल्वेने धडक देऊन जागीच पाच जण ठार झालेल्यांची ओळख पटली असून यात मृत्यू पावलेले गजेंद्र बाबासो ठोंबरे (वय ३२), तानाजी बाबासो ठोंबरे (वय ४०) महादेव धुळा टकले (वय ६०) गोवर्धन शंकर चराटे ( वय ४४), सविता तानाजी ठोंबरे (रा. गायगव्हाण, ता. सांगोला) येथील आहेत.
संजय गोडसे (रा. खिलारवाडी) येथील इंडिका कार भाडय़ाने घेऊन देवदर्शन करून खर्डी येथून सांगोलाकडे खर्डी बोहाळी उंबरगाव रेल्वे क्रॉसिंगवरून निघाले असता मिरज येथून पंढरपूरकडे येणाऱ्या रेल्वे गाडीने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर होऊन आतील सर्व जण मृत्यू पावले. हा प्रकार रात्री घडल्याने अंधारात मृतदेह ओळखणे कठीण झाले होते.
या ठिकाणी रात्रीही अपघात पहाण्यास गर्दी झाली होती. अपघातस्थळी तालुका निरीक्षक दिनकर मोहिते हजर होऊन मृतदेहाची तपासणी केली असता ओळखपत्र सापडल्याने ओळख पटली व मृत पावलेले सर्व जण गायगव्हाण येथील असल्याचे सिद्ध झाले.
सुमारे एक महिन्यापूर्वी विनागेट बोहाळी खर्डी, उंबरगाव रेल्वे क्रॉसिंगवर मोटारसायकलला उडवले. त्यात तीन जण जागीच ठार झाले होते. या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या ठिकाणी गेट बसवावे ही तीन गावच्या सरपंच यांनी ठरावाद्वारे मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. या ठिकाणी तातडीने गेट बसवणे गरजेचे असून आता तरी रेल्वेने त्वरित पावले उचलून संभाव्य धोके टाळावेत अशी मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा