‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया झालेल्या कर्णबधिर मुलीला कॉक्लिअर कंपनीचे ८१० हे कानाचे मशिन घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. नाशिकच्या भोसला हायस्कूलच्या बालक मंदिर या शाळेत शिकणाऱ्या अपूर्वा पाटील या मुलीच्या हृदयाला तीन छिद्रे होती. त्यानंतर इम्प्लांटलाही सहा लाख रुपयांचा खर्च आला. मात्र अपूर्वा जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करत आहे. अपूर्वा सध्या न्युक्लस स्प्रिंट हे मशिन वापरत असून काही तांत्रिक कारणास्तव ते बंद पडणार आहे व या मशिनचे स्पेअर पार्ट्सही मिळणे बंद होणार आहे. डॉक्टरांनी तिला कॉक्लिअर कंपनीचे ८१० हे मशिन वापरण्यास सांगितले आहे. मात्र त्या मशिनची किंमत तीन लाख रुपये आहे. तरी मदत करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी ८३७८९४३४७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.