इमारतीच्या गच्चीवर ऊन, पावसापासून संरक्षण म्हणून निवाऱ्यासाठी उभारलेल्या शेडवरून पडून डोंबिवलीत नेहरू रस्त्यावरील एका रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला. परेश लीलाधर व्होरा (३८) असे मृत रहिवाशाचे नाव आहे. कच्च्या आंब्याचे काप ताटात ठेवून ते उन्हात वाळवण्यासाठी परेश इमारतीच्या गच्चीवरील निवारा शेडवर चढले होते. पाय घसरल्याने ते खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
इमारतीवरून पडून रहिवाशाचा मृत्यू
इमारतीच्या गच्चीवर ऊन, पावसापासून संरक्षण म्हणून निवाऱ्यासाठी उभारलेल्या शेडवरून पडून डोंबिवलीत नेहरू रस्त्यावरील एका रहिवाशाचा रविवारी मृत्यू झाला.
First published on: 21-05-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of civilian due to fall down from building