प्रसिद्ध आडत व्यापारी माजी नगराध्यक्ष एन. एफ. बांगर यांचे बंधू कुंडलीकराव बांगर यांचे अल्प आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कयाधू नदीच्या तिरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, माजी आमदार गजानन घुगे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमदार जगानन घुगे, शामप्रकाश देवडा, प्रकाश सोनी, भास्कर गुंडेवार यांच्या विविध पक्षांचे नेते, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोंढा बाजार या वेळी बंद होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा