हिंगोली जिल्हा परिषदेच्या करंजाळा गटातून शिवसेनेच्या वतीने निवडून आलेले सदस्य एकनाथ गंगाधर कदम (वय ४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कदम यांना सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Story img Loader