तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात सहाचारी डी. एड. कॉलेजजवळ भडांगे वस्तीवर पडलेल्या सशस्त्र दरोडय़ातील मारहाणीत जखमी झालेल्या उमाजी हनुमंत भडांगे (वय ८५) या वृद्धाचे आज शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. या दरोडय़ात दरोडेखोरांच्या मारहाणीत एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. उमाजी भडांगे यांच्यावर कोळपेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader