श्रीगोंदे तालुक्यातील मखरेवाडी येथील शिवाजी संभाजी मखरे यांचा कर्जत-श्रीगोंदे रस्त्यावर अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र पोलिसांना आलेल्या एका निनावी दूरध्वनीने मखरे यांचा मृत्यू ट्रॅक्टरच्या धडकेने झाल्याचे उघड झाले. यासंदर्भात पोलिसांनी ट्रॅक्टरचालक गणेश सदाशिव सुपेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला व ट्रॅक्टरही जप्त केला. सुपेकर हा फरार आहे. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा मखरे यांच्या नातेवाइकाना संशय आहे.
कर्जत तालुक्यातील कुळधरन गावाजवळ श्रीगोंदे रस्त्यावर शिवाजी मखरे (वय २६) यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होती व हाताला लागले होते. त्यांची मोटारसायकल (एमएच १२ बीके ७०४८) रस्त्यावरच पडलेली होती. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ही घटना कशी घडली याची माहिती काल दिली. पोलिसांनी लगेच तसा तपास केला व गणेश सुपेकर याच्यावर गुन्हा नोंदवत त्याचा ट्रॅक्टर जप्त केला. मखरे हे कर्जतहून श्रीगोंद्याकडे जात असताना समोरहून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली व निघून गेला अशा अपघाताची नोंद पोलिसांनी केली. मात्र मखरे यांच्या नातेवाइकांना हा अपघात नसून घातपात असावा असा संशय आहे व त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा