शिवसेनेचे प्रथम जिल्हाप्रमुख दामोदरअण्णा शेटे यांचे अल्प आजाराने मंगळवारी सकाळी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.
परभणी व िहगोली जिल्ह्यांत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात शेटे यांचा मोलाचा वाटा आहे. १९८६मध्ये तत्कालीन संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत िपपरी देशमुख येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. शेटे यांनी पूर्वीच्या एकत्रित असलेल्या परभणी व िहगोली जिल्ह्यांत एकूण ९८० शाखा सुरू केल्या. सुरेगाव येथे १० डिसेंबर १९८६ रोजी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा प्रश्न विधानसभेपर्यंत पोहोचविला. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला परभणी व िहगोली लोकसभा मतदारसंघात पहिले यश मिळाले. १९९१मध्ये पाथरी, परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्यातही शेटे यांचा सहभाग होता. १९९५पर्यंत शेटे शिवसेनेत सक्रिय होते. त्यानंतर बदलत्या काळात ते सेनेपासून काहीसे दूर राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of shivsena former districtchief damuanna shete