फरशी वाहतूक करीत सोलापूरमार्गे पुण्याकडे निघालेल्या मालमोटारीला अपघात होऊन त्यात मालमोटार चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळनजीक यावलीजवळ रात्री हा अपघात घडला.
राजू शरणप्पा माळी (रा. येळी, ता.उमरगा) असे मृत मालमोटार चालकाचे नाव आहे. त्याशिवाय ओम राम अंगबरे यांचाही मृत्यू  झाला. विनोद लक्ष्मण अंगबरे व श्रीराम फडताळे हे दोघे जखमी झाले. हे सर्व जण मालमोटारीत बसून पुण्याकडे निघाले होते. परंतु मोहोळजवळ यावली येथे समोरील ऊस वाहतुकीच्या वाहनाला मालमोटारीची जोरदार धडक बसली. मोहोळ पोलीस ठाण्यात मृत मालमोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader