मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
सिद्धाराम कल्लप्पा बन्न्ो (८) व त्याचा भाऊ रेवणसिद्ध (७) अशी दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. मोहोळजवळ गाढवे वस्ती येथे डॉ. शैलेंद्र झाडबुके यांची शेती आहे. त्या ठिकाणी कल्लप्पा बन्न्ो (रा. धूळखेड, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) हा गेल्या दीड महिन्यापासून सालगडी म्हणून काम करीत आहे. पत्नी व दोन लहान मुलांसह वस्तीवर राहात असताना कल्लप्पा याची मुले सिद्धाराम व रेवणसिद्ध यांना आश्रमशाळेत पाठविण्याची सूचना शेतमालक डॉ. झाडबुके यांनी सालगडी कल्लप्पा यास दिली होती. तसेच बाजारहाट करण्यासाठी पैसेही दिले होते. त्यानुसार कल्लप्पा हा पत्नीसह बाजारासाठी निघण्याच्या घाईत असताना त्याची दोन्ही मुले पोहण्यासाठी जवळच्या कालव्यात गेली. परंतु कालव्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्याचा अंदाज आला नाही आणि दोन्ही मुले पाण्यात बुडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा