येथील वसंतराव अंबादासराव जोशी मंगरुळकर यांचे शनिवारी (दि. २१) सकाळी पावणेअकरा वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, गिरीष, सतीश, सुहास, उल्हास, अविनाश अशी पाच मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पाíथवावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद येथील सिडको एन-६ मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारिता, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी तसेच नातेवाईक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ते पत्रकार सतीश जोशी यांचे वडील होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा