विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात उभी फूट पडल्यानंतर विद्यमान शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांनी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या बालेकिल्ल्यात आंदोलनाचे नेतृत्व करीत प्रथमच आव्हानात्मक पवित्रा घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्हयातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांचे नेतृत्व करणारी वि.मा.शि.संघ ही एक बलाढय संघटना समजल्या जाते. विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीवेळी मात्र उभी फू ट पडली. व्ही.यू.डायगव्हाणे यांना परत उमेदवारी नाकारत खोटरे गटाने स्वतंत्र उमेदवार उभा केला व आपलीच संघटना अधिकृत असल्याचा दावा करीत डायगव्हाणेंच्या पराभवात मोठा वाटा उचलला. दोन्ही गटाचे उमेदवार तसेच अमरावतीतून बी.टी.देशमुख यांचाही पराभव झाला. नागपूर व अमरावती अशा दोन्ही विभागात शिक्षक परिषदेचे नागो गाणार व रणजित पाटील वियजी झाले.
हा वाद अद्याप शमलेला नाही. याच दरम्यान डायगव्हाणे गटाने जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक घेत आपला स्वतंत्र मार्ग चोखाळला. त्यामुळे खोटरे व डायगव्हाणे अशा दोन गटाचे दोन जिल्हाध्यक्ष विदर्भातील प्रत्येक जिल्हयात काम करू लागले. आता दोन कुंकुवाचे धनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वि.मा.शि.संघाच्या सामान्य शिक्षक कार्यकर्त्यांपूढे मोठा पेच उभा झाला आहे. पण त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहल्याने त्याची खंतही या शिक्षकांना आहे. प्रामुख्याने नागपूर विभाग हा वि.मा.शि.संघाचा गड समजल्या जातो. आमदार खोटरे हे अमरावती विभागाचा किल्ला सांभाळतात. पण आता डायगव्हाणेंचे कार्यक्षेत्र समजल्या जाणाऱ्या नागपूर विभागात आमदार खोटरेंनी उडी घेतली आहे. डायगव्हाणेंच्या खंद्या समर्थकांना फ ोडत त्यांनी फ ळी मजबूत केली. पण या बळावर ते नागपूर विभागाचे नेतृत्व करू शकतील काय? असा प्रश्न आहे.
उद्या, १ डिसेंबरला विदर्भातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे वि. मा. शि.संघाच्या खोटरे गटाने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्रातून आंदोलनाची बाजू मांडली. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफोरसी आहे तशाच शिक्षकांना लागू कराव्या. कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता असलेल्या शाळांच्या मुल्यांकनाचे सुधारित निकष, ३१ ऑक्टोंबर २००५ पूर्वी सेवेत असणाऱ्यांना जूनी पेंशनयोजना लागू असावी अशा व अन्य मागण्या आहेत. जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश ठाकरे यांनी नमूद केले की आमदार खोटरे यांच्या नेतृत्वात कार्यरत वि.मा.शि.संघच शासनाकडे मागण्यांबाबत चर्चा करणार आहे. हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू. सर्व जिल्हयात १ डिसेंबरचे आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खोटरे गटाच्या या आंदोलनात वि.मा.शि.संघाचे फ निंद्र रघाटाटे, अशोक झोटिंग, प्रेमराज पालीवाल, व्ही.एम.देशमुख, विजय चौधरी, संजय सूरकार, प्रा. साहूरकर, प्रवीण होरे असे एकेकाळी डायगव्हाणे समर्थक समजल्या जाणारे पदाधिकारी पुढे आले आहेत. वि.मा.शि.संघाच्या दोन्ही गटातील वाद या आंदोलनानिमित्त अधिक गाजण्याची शक्यता आहे.
आजी माजी शिक्षक आमदारांचा वाद पेटला
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात उभी फूट पडल्यानंतर विद्यमान शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांनी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या बालेकिल्ल्यात आंदोलनाचे नेतृत्व करीत प्रथमच आव्हानात्मक पवित्रा घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्हयातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांचे नेतृत्व करणारी वि.मा.शि.संघ ही एक बलाढय संघटना समजल्या जाते.
आणखी वाचा
First published on: 01-12-2012 at 05:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debate between mla and teacher