ठाकुर्लीतील रेल्वेच्या जागेवरील बारा बंगला परिसरात असलेली ६१ झाडे तोडण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. या जागेवर रेल्वे प्रशासनाला सुरक्षा बल प्रपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे रेल्वे प्रशासनाने हरितपट्टय़ातील झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. या हरितपट्टय़ात एक हजाराहून अधिक झाडे आहेत. डोंबिवली परिसरातील हा एकमेव हरितपट्टा असल्याने ही झाडे तोडू नयेत, असे मत नगरसेवक चौधरी यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत व्यक्त केले होते. प्रशासनाने योग्य त्या प्रक्रिया पूर्ण करून ही झाडे तोडण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते.
समितीच्या सात ते आठ सदस्यांनी बहुमताच्या जोरावर रेल्वेच्या झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या वेळी नगरसेवक चौधरी यांनी आपला झाडे तोडण्यास विरोध असल्याचे मत नोंदवून विरोध दर्शविला. दरम्यान, समितीमध्ये दोन तज्ज्ञ सदस्य आहेत. पण समितीमधील एकूण मॅनेज कारभार पाहून ते या बैठकीकडे कधीच फिरकत नसल्याचे सांगण्यात येते.कल्प उभारायचा आहे. हा हरितपट्टा डोंबिवलीचा प्राणवायू आहे म्हणून झाडे तोडण्यास परवानगी देऊ नये यासाठी भाजपचे या भागातील नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी विरोध केला होता.

Story img Loader