मुंबईतील इंदू मिलची जागा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर कोल्हापुरात आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
केंद्र शासनाचा निर्णय घोषित झाल्यानंतर परिवर्तनवादी विचाराचे कार्यकर्ते बिंदू चौकात एकत्र आले. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला. आरपीआयचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. पंडितराव सडोलीकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. या वेळी उत्तम कांबळे, बाळासाहेब वाशीकर, विलास भामटेकर, दत्ता पिसाळ, संपत लोखंडे, दगडू भास्कर, लोकशक्ती पक्षाचे बाळासाहेब भोसले, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, पब्लिक रिपब्लिक पक्षाचे नंदकुमार गोंधळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. शहर कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी नागरिकांना साखर पेढे वाटले. यामध्ये संभाव्य नगराध्यक्ष जयश्री सोनवणे, श्रीकांत बनछोडे, उपमहापौर दिगंबर फराकटे, शारंगधर देशमुख, रणजित परमार, जहाँगीर पंडत, दिलीप भुरके, राजश्री साबळे, लीला धुमाळ, चंदा बेलेकर, सागर चव्हाण, सरचिटणीस एस. के. माळी, विक्रम जरग, महिला आघाडी अध्यक्ष संध्या घोटणे, सरचिटणीस रूपाली पाटील आदींचा सहभाग होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा