या जिल्ह्य़ातील निसर्गरम्य निरंजन माहूर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावर कळंबजवळील या ठिकाणाला ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. जिल्हा नियोजन समितीने ५.५० कोटीचा आराखडाही मंजूर केलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत भव्य असे सभागूह, गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता, तलावापासून पाण्याची विहीर, पाईपलाईन व गडावर पाण्याची व्यवस्था, अशी कामे झालेली आहेत.
पूर्वी रस्ता नसल्यामुळे दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढून भाविकांना व पर्यटकांना जावे लागत होते. आता डांबरी रस्ता झाल्यामुळे वाहने वरपर्यंत गडावर जात आहेत. दत्तपूर मंदिर परिसराच्या अवतीभावती डोंगर टेकडय़ा वनविभागाचे क्षेत्र असल्यामुळे तिर्थक्षेत्राच्या सौंदर्यात भर पडली आहे. गडावर भ्रमण करताना लोणावळा महाबळेश्वला गेल्याचा आनंद मिळतो. १७ नोव्हेंबरला दत्तपूर पर्यटनस्थळाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी, मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपवनसरंक्षक मोरणकर, पत्रकार न.मा.जोशी यांच्यासह विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी भेट देऊन या पर्यटनस्थळाचा आढावा घेतला. सर्वांनी जवळपास ४ तास येथे पाहणी करून सौंदर्यीकरणासाठी काही सूचनाही केल्या. अधिकाऱ्यांनी तलावाच्या बाजूला वनविभागाने रोहयो अंतर्गत केलेल्या रोपवाटिकेची पाहणी केली. यात कडूिनब, जांभूळ, चिंच आदी एक लाख रोपे तयार करण्यात आलेली आहेत. या पाहणीदरम्यान परिसरातील ग्रामस्थ, तसेच कळंब पंचायत समितीचे सभापती मांडवकर, गटविकास अधिकारी, तहसीलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, लागवड अधिकारी, सरपंच साठे, वन सरंक्षण समितीचे अध्यक्ष मारे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा