माळशिरस तालुका पंचायत समितीअंतर्गत एकात्मिक बालविकास योजनेच्या अंगणवाडी मदतनीसपदावर आपली गुणवत्तेत निवड झाली असतानाही फसवणूक करून आपल्याकडून पंचायत समितीच्या एका महिला सदस्याने २० हजारांची रक्कम उकळल्याची आश्लेषा भारत सोरटे या महिलेने केलेल्या तक्रारीकडे याच तालुका पंचायत समितीच्या सदस्या श्रीलेखा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
आश्लेषा सोरटे (रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांनी श्रीलेखा पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांना लेखी पत्र सादर करून या प्रकरणाची चौकशी करण्याची व त्यात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा