रब्बी ज्वारी पीक विमा योजनेसाठी केवळ सोलापूर जिल्ह्य़ासाठी असणारे वेगळे निकष बदलून ज्वारी पीक विमा घेण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी राज्याचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी एका निवेदनाद्वारे कृषिमंत्री व संबंधितांकडे केली आहे.
नॅशनल अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे वतीने शेतक ऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाते. साधारणपणे शेतक ऱ्यांना एक एकर ज्वारीसाठी कंपनीकडे २७४ रुपये भरल्यास त्यास १३ हजार ७०० रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. पीक विमा योजनेंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, करडी आदी पिकांचा समावेश होतो. परंतु ज्वारी पिकांसाठी हंगाम लवकर सुरू होतो, या कारणास्तव सोलापूर जिल्ह्य़ासाठी ही मुदत ३० नोव्हेंबपर्यंतच आहे. शेजारील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्य़ांसाठी ही मुदत ३१ डिसेंबपर्यंत आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांत निसर्ग व पावसाच्या अनियमिततेमुळे सोलापूर जिल्ह्य़ातील ही पेरण्या उशिराच होतात. परंतु या निकषामुळे या जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा निकष बदलण्याची मागणी सातत्याने होत आहे. या वर्षी तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने कृषि व महसुली अधिकारी त्या कामाकरिता नेमले होते. त्यामुळे शेतक ऱ्यांना ७/१२ उताराही वेळेवर मिळाला नाही. शिवाय ही विमा रक्कम स्वीकारणाऱ्या सर्वच राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्यांमध्ये शेतक ऱ्यांना सहकार्य करण्यात नेहमीच उदासीनता दिसते. त्यामुळे व केरळ सोलापूर जिल्ह्य़ासाठीच लागलेल्या वेगळ्या निकषामुळे या भागातील शेतकरी या पीक विमा योजनेपासून वंचित राहत असल्याने या जिल्ह्य़ाकरिता असणारी मुदत ३१ डिसेंबपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा