राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या वतीने इतरांनी लिहिलेल्या साहित्याऐवजी डॉ. आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्यच प्रकाशित करावे, अशी आग्रही मागणी भारतीय दलित पँथरच्यावतीने करण्यात आली आहे.
समिती स्थापन केल्यापासून गेल्या ३७ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने केवळ २२ खंड व दोन संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले. मात्र २००४पासून अप्रकाशित साहित्यावरील एकही चुकाहीन खंड प्रकाशित झालेला नाही. शेवटचे २१ व २२ क्रमांकाचे खंड चुका व त्रुटींनी वादग्रस्त ठरले. गेल्या हिवाळी अधिवेशनात २२व्या चरित्रात्मक खंडाची सुधारित आवृत्ती प्रकाशित व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ३० मार्च २०१२च्या पत्रानुसार समिती सदस्य सचिवांना याविषयी तात्काळ अभिप्राय भारतीय दलित पँथरला कळवण्याचा आदेश दिला आणि ५ सप्टेंबर २०१२च्या बैठकीत खंड २२ सुधारित करण्याचा निर्णय समितीने घेतला. मात्र, त्यातही एक अडचण समितीने उभी केली आहे. याच बैठकीत बाबासाहेबांच्या जीवनावर इतरांनी लिहिलेले २० संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय सदस्य सचिव अविनाश डोळस यांनी घेतला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे अध्यक्ष राजेश टोपे यांनी सारासार विचार न करता सात सदस्यांची उपसमिती स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र, याच्या पुढील परिणामांचा विचार बैठकीत एकानेही केला नाही. यापुढे बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याऐवजी इतरांनी लिहिलेला मजकूर समिती खंड रूपाने प्रकाशित करणार असल्याने समितीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. यासंदर्भात भारतीय दलित पँथरने जोरदार आक्षेप घेतला आहे.
समितीच्या सदस्य सचिवांना ठिकठिकाणी विखुरलेले डॉ. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित गोळा करण्याची मेहनत न घेता रेडिमेड साहित्य प्रकाशित करून स्वत:चे श्रम वाचवायचे आहेत. यामुळे पोटभरू लेखकांचा सुळसुळाट होईल आणि सकस साहित्य निर्मिती ऐवजी मानधन प्राप्त करण्यावरच लेखकाचा भर राहिल. त्यातून आगामी पिढीला बाबासाहेबांचे क्रांतिकारी साहित्य कधीही वाचायला मिळणार नाही, अशी भिती संघटनेचे प्रकाश बन्सोड यांनी व्यक्त केली आहे. असे रेडिमेड, संस्कारित साहित्य संशोधनहीन आणि उचलेगिरीवर आधारण्याचीच शक्यता जास्त आहे.
डॉ. आंबेडकरांनी १९३० ते १९३३ या कालावधीत गोलमेज परिषदेविषयी निर्माण केलेल्या सात समित्यांचे सदस्य होते. इतकेच नव्हे तर व्हॉईसरायच्या शासनात १९४२ ते १९४६ दरम्यान श्रममंत्री असताना त्यांच्याकडे ११ महत्त्वाची खाती होती. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना तयार होत असताना ज्या दहा विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. त्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे एकूण आठ विषय पँथरने १८ मार्च २०१०मध्ये समितीला सुचवले होते. यासर्व समित्यातून व बाबासाहेबांच्या कामगिरीला अविनाश डोळस यांच्या प्रस्तावामुळे खीळ बसेल, असे बन्सोड यांचे स्पष्ठ म्हणणे आहे.
डॉ.आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी
राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या वतीने इतरांनी लिहिलेल्या साहित्याऐवजी डॉ. आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्यच प्रकाशित करावे, अशी आग्रही मागणी भारतीय दलित पँथरच्यावतीने करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-01-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for publication of basic unpublished literature of dr ambedkar