कराडनजीकचे विद्यानगर हे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे कराड व पाटण तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातून उच्च शिक्षण आणि विविध विषयांच्या क्लासेससाठी येणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने त्यांना शहर वाहतूक सेवेच्या एसटी बसेस अपुऱ्या पडत आहेत. तरी या मार्गावर महिला व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बसची सोय करण्यात यावी अशी मागणी ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी कराड एसटी आगारप्रमुखांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
विद्यार्थिनी व महिलांना कराड-विद्यानगर तसेच काले-मसूर बसमधून प्रवास करताना काही अपप्रवृत्तीच्या तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार यापूर्वी घडले असतानाही मुली शिक्षण घेण्याच्या हेतूने घरच्यांच्या व समाजाच्या भीतीमुळे होणाऱ्या त्रासाची कोठेही वाच्यता करत नाहीत. तरीसुद्धा काही धाडसी विद्यार्थिनींनी सातारा जिल्हा ‘एनएसयूआय’ (विद्यार्थी काँग्रेस)कडे छेडछाडीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत.
विद्यार्थिनी व महिलांवर होणाऱ्या या अन्यायकारक गोष्टी टाळण्यासाठी जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कराड आगारातून खास विद्यार्थिनी व महिलांसाठी कराड ते विद्यानगर स्वतंत्र महिला राखीव बससेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींसाठी कराड-विद्यानगर बससेवेची ‘एनएसयूआय’ची मागणी
कराडनजीकचे विद्यानगर हे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे कराड व पाटण तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातून उच्च शिक्षण आणि विविध विषयांच्या क्लासेससाठी येणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने त्यांना शहर वाहतूक सेवेच्या एसटी बसेस अपुऱ्या पडत आहेत. तरी या मार्गावर महिला व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बसची सोय करण्यात यावी अशी मागणी ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी कराड एसटी आगारप्रमुखांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
First published on: 11-03-2013 at 09:04 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of karad vidyanagar bus service for girl student by nsui