डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले उभे आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यासाठी वेचले व त्यासाठी बलिदानही केले. त्यांच्या कार्याबद्दल व हौतात्म्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यावा, अशी विनंती महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीचे सदस्य पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डॉ. दाभोलकरांचे प्रबोधनाचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखून त्याची कार्यवाही राज्यातील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थी कल्याण विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करून करण्याची विनंतीही त्यांनी पत्रात केली आहे.

Story img Loader