राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी जोडल्या गेल्यामुळे या विभागातून ग्रंथालय चळवळीच्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या प्रलंबित मागण्या सुटत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालये सांस्कृतिक विभागाशी जोडावीत असे मत माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी व्यक्त केले.
येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सत्यशारदा सार्वजनिक ग्रंथालय, परभणी आयोजित मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या ३७ व्या व परभणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ३१ व्या वार्षकि अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी वरपुडकर बोलत होते. उद्घाटक म्हणून महापौर प्रताप देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्रा.इंद्रजित भालेराव, सहायक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, प्रा.डॉ.रामेश्वर पवार, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सूर्यवंशी, प्रा.विलास वैद्य, अनिल बावीस्कर, आशिष ढोक, ना.वि.देशपांडे, नरहरी मंठेकर, भास्कर िपपळकर, विलास िशदे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वरपुडकर म्हणाले, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये शिक्षणाची भूक भागविण्याची काम करत आहेत. राज्य शासनाने गाव तेथे ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. महापौर देशमुख यांनी प्रत्येक गावाची ओळख ग्रंथालयामुळेच होते असे सांगून राज्य शासनाची शासकीय ग्रंथालये जशी आहेत तशीच सार्वजनिक ग्रंथालये असावीत. शासनाने ग्रंथालयात भेदभाव करू नये असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा.भालेराव यांनी ‘ग्रंथ माझे गुरू, ग्रंथ मायबाप’ ही कविता सादर केली. गाडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य संयोजक प्रा.डॉ.पवार, सूत्रसंचालन प्रा.संजय कसाब तर आभारप्रदर्शन भास्कर िपपळकर यांनी केले.

Story img Loader