निवड समितीने सुचविलेल्या तसेच मान्यता दिलेल्या मुद्यांचा जनलोकपालाच्या मसुद्यात समावेश करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना पत्र पाठवून केली आहे. संसदेत लोकपाल तसेच लोकायुक्त विधेयक मांडण्यासाठी दोघांनीही घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हजारे यांनी आपल्या पत्रात स्वागत केले आहे.
निवड समितीमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी या मुद्यांना सर्वसंमतीने मान्यता दिलेली आहे. निवड समितीने सादर केलेल्या मुद्यांव्यतिरिक्त आणखी सक्षम मुद्यांचा समावेश करून हा कायदा अधिक सक्षम बनविण्याचा संसदेने प्रयत्न केला तर सामान्य जनतेच्या ते हिताचे होईल असेही हजारे यांनी गांधी व जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
लोकपाल विधेयकात समाविष्ट करण्याची मागणी
निवड समितीने सुचविलेल्या तसेच मान्यता दिलेल्या मुद्यांचा जनलोकपालाच्या मसुद्यात समावेश करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना पत्र पाठवून केली आहे.
First published on: 18-12-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand of selection panel issues include in ombudsman bill