वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय निर्मिती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. मागणीचा पाठपुरावा सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडेही करण्यात येत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवींद्र बडेकर यांनी दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता. वाळवा) मूळ गाव आहे. तेथे त्यांच्या साहित्याचे संग्रहालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी जुनीच असली, तरी संग्रहालय निर्मिती समितीने त्याचा पाठपुरावा करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. साहित्यप्रेमींची मागणी असल्याने त्याचा सारासार विचार करून लोकांच्या अपेक्षापूर्ती करण्यासाठी साठे यांच्या साहित्याचे संग्रहालय उभे राहण्यासाठी शासनाने सकारात्मक प्रयत्न करावा, असे बडेकर यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय निर्मिती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
आणखी वाचा
First published on: 17-11-2013 at 01:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to chief minister for wategao memorial of anna bhau sathe