महापालिका कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी गोपनीय न ठेवता विभागानुसार जाहीर करावी व त्यानुसारच पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी शहीद भगतसिंग कामगार कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनिल नाटेकर आणि सचिव विजय पवार यांनी महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी गोपनीयरीत्या तयार करून, परस्पर वैयक्तिक आदेश काढून पदोन्नती मिळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला. महापालिकेत वरिष्ठ लिपिकपदावर असलेले मात्र सध्या आस्थापना अधीक्षकपदावर प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले एक अधिकारी ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्ती आधी आस्थापना अधीक्षक ही पदोन्नती मिळविण्याचा त्या अधिकाऱ्याचा डाव असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. सेवाज्येष्ठता यादी नियमानुसार तयार करून वृत्तपत्रातून जाहीर करावी व त्यानुसारच पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा