कळवण व देवळा भागात अलीकडेच वादळ व गारांसह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. ए. टी. पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्याकडे केली आहे.
कळवण तालुक्यातील पिळकोस, बगडू, मादवण तर, देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात झालेल्या पावसामुळे शेतातच असलेला शेतीमाल भिजून त्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पोल्ट्री व्यावसायिक, ग्रीन हाऊस आदींचाही समावेश आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
कळवण व देवळा भागात अलीकडेच वादळ व गारांसह झालेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
First published on: 03-05-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to give compensation to damage affected farmers