राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले धोरण जाहीर करावे, विधान परिषदेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधित्व असावे इत्यादी मागण्यांकडे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक मंडळाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा रविवार,२७ जानेवारीला येथे आयोजित करण्यात आला आहे.
वैभव नगरातील बालाजी सोसायटीजवळील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या नियोजित वास्तू परिसरात आयोजित या सोहळ्याचे उदघाटन महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक चळवळीचे जनक व आईस्कॉनचे मुख्य संपादक मुंबईचे डॉ. शं.पां. किंजवडेकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्येष्ठ नगारिक महासंघ अर्थात ‘फेस्कॉम‘चे उपाध्यक्ष जळगावचे दत्तू चौधरी राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक चळवळीतील राज्यातील ज्येष्ठ कार्यकत्रे मधुसूदन कुलकर्णी, परशराम जाधव, विनायक पांडे, ना.ना. इंगळे, प्रकाश िपपरकर आणि वऱ्हाड वैभव पाक्षिकाचे मुख्य संपादक प्रा. कुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळाला वडगाव ग्रामपंचायतने एक भूखंड दिला असून त्यावर इमारत बांधण्यासाठी खासदार भावना गवळी, खासदार विजय दर्डा, आमदार संदीप बाजोरीया, आमदार निलेश पारवेकर यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून एकूण ५० लाख ५० हजार रुपये दिले आहेत. त्यातून १० लाख २रुपयाचे सभागृह बांधून पूर्ण झाला आहे.
महाराष्ट्रात अशा प्रकारची भव्य आणि सुंदर वास्तू ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिलीच असेल. या वास्तूत सार्वजनिक वाचनालय आजी, आजोबा उद्यान आणि ३० बाय ७० चा भव्य हॉल, संरक्षक िभत इत्यादीमुळे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे बऱ्याच वर्षांंचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार, सचिव भाऊराव वाकडे, सहसचिव विजय उपलेंचवार यांनी येथे दिली. या वर्धापन दिन सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक दत्तोपंत िलगावार यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करून एल.एल.बी. पदवीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल, तसेच पत्रकार न.मा.जोशी यांची राज्य शासनाच्या इतर मागासवर्गीय आयोगावर सदस्यपदी नियुक्ती होऊन त्यांना राज्य शासनाने सचिवपदाचा दर्जा दिल्याबद्दल या दोघांचा सत्कारही आयोजित केला आहे. दोन सत्रात होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन कुळकर्णी राहणार असून वासुदेव उमाळे, अरिवद मोडक, बळवंत चिंतावार, अरुण नांदगावकर, अर्जुन लहाने, वासुदेव उमाळे, नाना इंगळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची ६५ वर्षांची अट शिथील करून ती ६० वर्ष करावी, ज्येष्ठ नागरिकांना आíथक पाठबळ, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याच्या सुविधा देणारे ज्येष्ठ नागरिक धोरण राज्य सरकारने त्वरित जाहीर करावे, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे केली जाणार आहे. राज्यातील ६० वर्षांवरील एक कोटी ज्येष्ठ नागरिकांमध्ये ५३ लाख महिला, तर ४७ लाख पुरुष आहेत. २००९ मध्ये राज्यात वृध्दांची संख्या ८४ लाख होती. राज्यात आज ६० वर्षांवरील ५० टक्के महिला विधवा आहेत, अशी माहिती यावेळी बळवंत चिंतावार यांनी दिली. राज्यातील सर्व नगर पालिका, महापालिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व स्मृतीभ्रंश विरंगुळा केंद्राची स्थापना करण्याची गरजही चिंतावार यांनी प्रतिपादन केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा