शांतीदूत व नोबेल पुरस्कारप्राप्त मदर टेरेसा यांचा पुतळा काटोल मार्गावरील ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ कार्यालय ते महावितरण चौकादरम्यान उभारण्याची मागणी महापौर अनिल सोले यांना एका निवेदनातून करण्यात आली.
दीन:दुखी तसेच गरीब व कुष्ठरोग्यांची जीवनभर सेवा करणाऱ्या शांतीदूत मदरटेरेसा यांचा पुतळा बसविण्यात आला तर नागपूर नगरीचा गौरव वाढेल, अशी विनंती महापौरांना करण्यात आली.
नगरसेवक गुड्डू तिवारी, शहर काँग्रेस सचिव जॉन थॉमस, अनंत उके, व्ही.आर. जॉन्सन, प्रकाश अँथोनी, प्रभाकर किनकर, गोपाल बॅनर्जी, दिलीप जनबंधू, दिनेश धुर्वे, दत्ता नागुलवार याप्रसंगी उपस्थित होते. महापौर अनिल सोले व उपमहापौर संदीप जाधव यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-01-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to make mother teresa statue