स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने चौकशी करून जबाबदार असणाऱ्याकडून ते वसूल करावे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांनी रविवारी पत्रकार बठकीत दिली.
    जनतेला वेठीस धरून पश्चिम महाराष्ट्राचे कामकाज ठप्प करणाऱ्या संघटनेने अचानक आंदोलन स्थगित का केले, असा प्रश्न उपस्थित करून उसाला प्रतिटन ३ हजार रुपये देण्याची रास्ता मागणी होती. यासाठी मनसेचा लढा चालूच राहील असे सांगून खाडे यांनी संशयास्पद आंदोलन करणाऱ्या संघटनेची मान्यता रद्द करावी. या व अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा