गोंदियाच्या गणेशनगरातील बी.जे.हॉस्पिटलमध्ये कल्पना धम्रेन्द्र उके (रा.केशोरी) हिला प्रसूतीकरिता सोमवारी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. मात्र, शस्त्रक्रिया करीत असतांना तिच्या पोटातील रक्तवाहिनी कापली गेली. त्यामुळे रक्तस्राव होऊन रात्री १२ वाजून १० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. पसे उकळण्याकरिता रुग्णांचा जीव घेणाऱ्या डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी केली आहे.
केशोरी येथील कल्पना धम्रेन्द्र उके प्रसूतीकरिता गोंदिया तालुक्यातील कारंजा येथे आली होती. तिला प्रसूतीकरिता येथील गणेशनगरातील बी.जे.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुपारी बारापर्यंत तिची स्थिती सामान्य होती. मात्र, सायंकाळी पाचला डॉक्टरांनी सिझेरियन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी शस्त्रक्रिया झाली. गर्भपिशवी शिवत असताना पोटातील रक्तवाहिनी कापली गेली. त्यामुळे कल्पनाच्या पोटात रक्त जमा झाले. प्रकृती अधिकच खालावल्यामुळे दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंत,ु रात्री १२ वाजून १० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. दुपारी सर्वसाधारण स्थिती असताना एकाएकी शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पसे उकळण्याच्या नादात त्या महिलेचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी त्या रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे  सदस्य राजेश चांदेवार यांनी केली.

Story img Loader