शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील कॉ.मलाबादे चौकात आघाडी शासनाच्या विरोधात निदर्शने करून शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले,की राज्यातील काँग्रेस आघाडी शासन सर्वच क्षेत्रात घोटाळे करीत खाऊबीज धोरण राबवित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याबाबत सभापतींच्या दालनात बैठकीदरम्यान शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी घोटाळ्याबाबत शिवसेना स्टाईलने आपले परखड मत मांडले होते. तेव्हा सभापतींनी गैरसमजातून आमदार रावतेंना निलंबित केले. हा प्रकार म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.    या वेळी शहरप्रमुख धनाजी मोरे, उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, महादेव गौड, उपजिल्हाप्रमुख साताप्पाभवान, मधुकर पाटील, तालुका प्रमुख सतीश मलमे यांचीही भाषणे झाली. महेश बोहरा, मंगल चव्हाण, मंगल मुसळे, आशाराणी उपाध्ये, संगीता कुचनूरे, मनीषा बंब आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Story img Loader