जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या.   आमदार संतोष सांबरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आणि ए. जे. बोराडे, जिल्हा उपप्रमुख पंडितराव भुतेकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जालना शहरप्रमुख विष्णू पाचफुले आणि बाला परदेशी, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, महिला जिल्हा आघाडीप्रमुख सविता किवंडे इत्यादींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मागणी करणाऱ्या गावांत दोन दिवसांत टँकर सुरू करा, टँकर मागणी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा, प्रत्येक पंचायत समिती गटात गुरांच्या छावण्या सुरू करा, जालना शहरात गुरांच्या छावण्या सुरू करा, रोजगार हमीची कामे सुरू करून जलसंधारण कामांना प्राधान्य द्या,  जिवंत फळबागांना त्वरीत कर्ज द्या इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Story img Loader