उरण तालुक्यातील पाणीटंचाईमुळे घरांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीने डेंग्यूला आमंत्रण मिळत आहे. भेंडळ तालुक्यातील एका संशयित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील भोंडखळ , केगांव आणि आवेर या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यातील डेंग्यूच्या रुग्णांवर उरण, पनवेल, वाशी आदी परिसरातील खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यातील अनेक रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे. गतवर्षी करंजा येथील एका विवाहितेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. पावसाचे साचलेले पाणी व पाणीटंचाईमुळे पंधरा पंधरा दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याचा होणार वापर यामुळे डेंग्यूच्या मच्छरांची पैदास होत असल्याचे मत उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.जी.संकपाल यांनी व्यक्त केले आहे. तापाची साथ रोखण्यासाठी भेंडखळ, केगाव तसेच आवरे गावात आरोग्य विभागाच्या पथकांकडून घरांचे सव्‍‌र्हे सुरू असल्याचे त्यांनी संगितले. त्याचप्रमाणे डेंग्यू पैदास रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना नागकिरांना देण्यात येत असून त्यांनी त्याचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा