उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (शुक्रवारी) औरंगाबाद जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी पावणेदहा वाजता रांजणगाव खुर्द येथे पंतप्रधान सडक योजनेंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, बिडकीन (तालुका पैठण) येथे पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन, तसेच निवासस्थानाचे भूमिपूजन, नंतर गावात जाहीर सभा, तेथून धूपखेडा येथे काही वेळ थांबल्यावर एकतुनी (तालुका पैठण) येथे ७६५ केव्ही वीज उपकेंद्राचे उद्घाटन, दुपारी साडेचार वाजता सिडको येथे संत तुकाराम नाटय़गृहात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या २८व्या वर्धापनदिनानिमित्त कर्जवितरण सोहळा या कार्यक्रमांना पवार हजेरी लावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा