रोटरी क्लब मिडटाऊन, तसेच रोटरी क्लब लातूर यांच्या वतीने पत्रकार, पर्यावरणवादी लेखक अतुल देऊळगावकर यांचा सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण कर्वा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण कर्वा होते. व्यासपीठावर रोटरीचे प्रकल्प संचालक नेत्रतज्ज्ञ डॉ. प्र. के. शहा, रोटरी अध्यक्ष बसवराज उटगे, डॉ. दत्तात्रय दगडगावे, सचिव मितेश शहा उपस्थित होते. या वेळी देऊळगावकर यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पर्यावरण जागृतीसंदर्भातील ‘विश्वाचे आर्त’ या ग्रंथातून मांडलेले वास्तव, भविष्यातील जागतिक व वैयक्तिक समस्या यावर अभ्यासपूर्ण सिंचन मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे प्रोजेक्ट अध्यक्ष नेत्रतज्ज्ञ डॉ. प्र. के. शहा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार शरद कारखानीस, पी. यू. कुलकर्णी, निलंगेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे, शिरीष पोफळे आदी उपस्थित होते.
देऊळगावकर यांचा रोटरीतर्फे सत्कार
रोटरी क्लब मिडटाऊन, तसेच रोटरी क्लब लातूर यांच्या वतीने पत्रकार, पर्यावरणवादी लेखक अतुल देऊळगावकर यांचा सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण कर्वा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण कर्वा होते.
First published on: 14-11-2012 at 12:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deulgaoker gets congratulated by rottery