न्हावे ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या न्हावा खाडी परिसरात एकूण तीन पाडे असून, खाडीलगत असलेल्या या पाडय़ांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी तब्बल ३४ वर्षांनी सिडको प्रशासन सरसावले आहे. नुकताच सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या विभागाची पाहणी करून तीन पाडय़ांच्या विकासासाठी दहा कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
न्हावा हे तसे जागतिक कीर्तीचे नाव बनले आहे. न्हावा-शेवा बंदर या नावाने जेएनपीटी यापूर्वीच प्रसिद्ध आहे. न्हावा गावाला लागूनच ओएनजीसी व माझगाव डॉकचा प्रकल्प
याच ठिकाणी आहे. सिडकोच्या इतिहासात सिडको विरोधात झालेला शेतकऱ्यांच्या लढय़ाची सुरुवातही न्हावा खाडी परिसरातूनच झालेली आहे.
तीनही पाडे खाडीवर वसले असल्याने भरतीच्या वेळी गावात पाणी शिरण्यामुळे नेहमीच नुकसान सहन करावे लागते. १९७८ साली या विभागाला रस्त्याच्या मार्गाने जोडण्यासाठी तयार करण्यात आलेला पूल १९९४ मध्येच खचला आहे. त्याची सिडकोने दुरुस्ती करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ करीत होते. स्वातंत्र्यानंतर आजही या गावांना पुरेसा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खाडीकिनाऱ्यामुळे गावातील स्मशानभूमींचीही दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत सिडकोच्या दक्षता विभागाच्या प्रमुख प्रज्ञा सरवदे तसेच मुख्य नियोजन अभियंता के. के. वरखेडकर यांच्या नेतृत्वात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून या तीनही पाडय़ांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा