भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उद्या, मंगळवारी पदभार स्वीकारणार असून शेकडो कार्यकर्ते या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या जागी आमदार देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली आहे. पहिल्यांदाच भाजपला त्यांच्या रुपाने तरुण प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भाजपच्या राज्य परिषदेच्या बैठकीला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. या बैठकीला प्रमुख्याने सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या बैठकीत राज्या समोर असलेल्या विषयांवर चर्चा केली जाईल. यात प्रामुख्याने दुष्काळाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे. राज्य सरकारने राज्यातील बहुसंख्य भागात दुष्काळ असताना पुरेशा सोयी केल्या नाहीत. तसेच एलबीटीवरून व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. या बैठकीत राज्य सरकारच्या एलबीटीबाबतच्या भूमिकेवर टीका करण्यात येईल तसेच नव्या प्रदेश कार्यकारिणीची निवड होणार आहे.  

Story img Loader